दुकान खरेदीत पावणेचार कोटींची फसवणूक : जळगावातील खुबचंद साहित्यांसह चौघांविरोधात गुन्हा
Fraud of Rs. 54 Crores in shop purchase : Crime against 4 people in Jalgaon along with a lot of materials जळगाव : दुकान खरेदी करून देण्यासाठी वेळोवेळी तीन कोटी 73 लाख रुपये घेवूनही दुकान दुसर्यालाच विक्री करीत दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी जळागव प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक खुबचंद प्रेमचंद साहित्या (56), अनिल प्रेमचंद साहित्या (48), ममता अनिल साहित्या (46) व नितीन खुबचंद साहित्या (36, सर्व रा.मोहाडी रोड, जळगाव) या चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
फुले मार्केटमधील कापड दुकान व्यावसायीक महेंद्र रोशनलाल नाथानी (50) व त्यांचे भाऊ आनंद नाथानी यांना दुसर्या ठिकाणी दुकान घ्यायचे असल्याने त्यांनी बांधकाम व्यवसायीक खुबचंद साहित्या यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार साहित्या यांनी गोविंदा रीक्षा थांब्याजवळ बांधण्यात येणार्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाच्या जागेचा सातबारा उतारा नाथानी यांना दाखवला. ही जागा मुंबई येथील राजमुद्रा रिअल इस्टेट प्रा.लि.च्या मालकीची असून त्यांनी जागा खरेदीविषयी आपल्या कंपनीशी सौदापावती झाली असून तेथे व्यापारी संकूल बांधून दुकान विक्री करणार असल्याचे सांगितले. यासाठी सौदापावती करारनामा तसेच प्रस्तावित व्यापारी संकुलाचा नकाशा दाखवला. त्यानुसार नाथानी यांनी खुबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या व नितीन साहित्या यांची भेट घेऊन दुकान घेण्यासाठी तयारी दर्शवली. व्यवहार ठरवून झालेल्या चर्चेनुसार नाथानी यांनी 5 डिसेंबर 2017 रोजी के.पी. इन्फ्रास्ट्रक्चरच्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवले. त्यानंतर नाथानी बंधूंनी वेळोवेळी एकूण तीन कोटी 73 लाख रुपये दिले. मात्र सौदापावती करून देण्याचे टाळण्यात आले.


तगादा लावूनही झाला नाही उपयोग
व्यवहार पूर्ण करण्याविषयी वारंवार तगादा लावूनही उपयोग होत नसल्याने नाथानी हे 9 फेब्रुवारी 2024 रोजी साहित्या यांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संस्थेचा शिक्का असलेली तोंडी सौदापावती असे अपूर्ण कागदपत्रे देण्यात आले तसेच साहित्या यांनी शिवीगाळ करत ‘तुझे पैसे देत नाही, तुझे दुकान मी दुसर्याला विकून टाकले’ असे सांगत बाहेर काढून दिले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे शिवाय ही दुकाने साहित्या यांनी दुसर्याला विकल्याची माहिती नाथानी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळवली असता ही बाब खरी निघाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.