फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पावणेपाच कोटींचा दंड वसुल


55 crores fine from free rail passengers भुसावळ : रेल्वे प्रशासनाने फुकट्या रेल्वे प्रवाशांविरोधात धडक मोहिम उघडली आहे. या अनुषंगाने फेब्रुवारी 2024 महिन्यात राबवण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत 59 हजार प्रवाशांकडून तब्बल चार कोटी 67 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. प्रत्यक्ष उद्दिष्टापेक्षा 26.19 टक्के अधिक हा दंड आहे.

धडक कारवाईने प्रवाशांमध्ये उडाली खळबळ
भुसावळ डीआरएम ईती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार व सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये मोहिम राबवण्यात आल्यानंतर फुकट्या प्रवाशांसह नियमबाह्यपणे प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून दंड वसुली करण्यात आली.



अशी झाली कारवाई
फेब्रुवारी महिन्यात अनियमित प्रवाशांची एकूण 28.82 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यातून एक कोटी 40 लाखांचा दंड वसूल करण्यात आला तर विनातिकीट प्रकरणांमधून एकूण 30 लाख प्रकरणातून दोन कोटी 92 लाखांचा दंड वसुली करण्यात आला तर सामानाच्या बुक न केलेल्या एकूण 40 प्रकरणांमधून आठ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !