15 हजारांची लाच भोवली : राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
15,000 bribe: Rahuri police station assistant police sub-inspector in ACB’s net
राहुरी : वाईन शॉप दुकानाचा परवाना रद्द न करण्यासह दुकानांवरील ग्राहकांवर कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अहमदनगर एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.ज्ञानदेव नारायण गर्जे (भाग्योदय रो हाउस तपोवन रोड, राजबिर हॉटेल समोर मुक बधीर विद्यालय जवळ, अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
50 वर्षीय तक्रारदार हे आय.एम. मोटवानी र्वाइन शॉप राहुरी, अहमदनगर येथे व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. ते लिकरचां सप्लाय करतात. तक्रारदार यांच्या आय. एम. मोटवानी वाइन शॉपमध्ये नगर जिल्ह्यातून येणार्या लिकर खरेदी करणार्या ग्राहकांवर व तक्रारदार यांच्यावर कारवाई करून तक्रारदार यांना गुन्ह्यात आरोपी करून दुकानाचे परवाना रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदार व त्याच्या ग्राहकांवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 20 हजारांची लाच गर्जे यांनी 5 मार्च रोजी मागितली होती व त्यात 15 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. पंचांसमक्ष ज्ञानदेव नारायण गर्जे यांनी लाच स्वीवकारताच त्यांना अटक करण्यात आली व व राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस निरीक्षक निलिमा केशव डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने यशस्वी केला.