राज्यभरातील कोट्यवधी मैत्रेय ठेवीदारांच्या ठेवी परत करा : मुक्ताईनगर दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना साकडे


Return the deposits of crores of Maitreya depositors across the state : Salutes to Chief Minister who visited Muktainagar भुसावळ : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीकडे महाराष्ट्रातील दोन कोटी 16 लाख ठेवीदारांचे दोन हजार सहाशे कोटी रुपये अडकले आहे. ठेवीदार यांच्या ठेवीची मुदत संपून देखील परतावे परत करत नसल्या कारणामुळे फेब्रुवारी 2016 पासून मैत्रेय कंपनीवर महाराष्ट्र राज्यात सुमारे 31 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सर्व ठेवीदार आपल्या ठेवी गेल्या आठ वर्षांपासून शासन, प्रशासन, कोर्ट याच्या दारी चकरा मारत न्याय मागत आहेत मात्र अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. ठेवीदारांना न्याय देवून त्यांच्या ठेवी परत कराव्यात, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्याच्या दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

80 टक्के मालमत्ता शासनाकडे जमा
मैत्रेय कंपनीने ठेवीदार यांच्या ठेवीतून भारत भरात सुमारे 10 हजार कोटीपेक्षा अधिक रुपयांच्या स्थावर, जंगम, मोकळ्या जागा, शेअर या स्वरूपात मालमत्ता आहेत. यातील 80 टक्यांपेक्षा अधिक मालमत्ता शासन नियुक्त .सक्षम प्राधिकारी (उपजिल्हा अधिकारी, मुंबई) यांनी योग्य तपासातून जमा केल्या आहेत. त्यातील 85 टक्के मालमत्ता विक्री करण्यास काही हरकत नाही परंतु मा.प्रशासनाने तसे विक्री करण्याचे आदेश मा.न्यायालयाकडून आज पावते घेतले नाहीत. आपण मा.सक्षम प्राधिकारी व ईओडब्ल्यू यांना आदेश करून स्वतः या प्रकरणात लक्ष देऊन आपल्या जनतेला परतावा परत मिळून देऊन न्याय करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.




मा.मुख्यमंत्र्यांनी
1) जमा मालमत्ता याच्यातील 325 मालमत्ता याच्यावर कोणाचाही दावा नाही अशा मालमत्ता विक्री करण्याची आदेश शासन नियुक्त मा.स्पेशल कोर्ट क्र.20 याच्या कडून लवकरात-लवकर घेण्यात यावा

2) शासन जमा मालमतेतील 50 मालत्तांवर दावे असल्याचे समजते तरी ते दावे लवकरात लवकर मा.स्पेशल कोर्ट याच्या माध्यमातून सोडून त्या मालमत्तांबद्दलचा लवकरात लवकर निकाल काढावा

3) उर्वरीत 335 मालमत्ते बद्दलचे सर्व दावे आहे किंवा नाही ही तपासाची कार्यवाही मा.सक्षम प्राधिकारी सो.यांच्या कडून लवकरात लवकर करून घ्यावीत.

4) कंपनी कडून काही अर्धवट व्यवहार तसेच काही मालमत्ता करारावर दिल्याचे समजते. तेव्हा त्या मालमत्ता तातडीने जप्ती करण्यासाठी आपण मा.पोलीस महासंचालक, मा.जिल्ह्याधिकारी, मा.सक्षम प्राधिकारी व एजथ. यांना आपल्या वतीने आदेश करून कार्यवाही लवकर पूर्ण करण्यास सांगावे.

आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मैत्रेय उपभोक्ता एवंम अभिकर्ता असोसिएशनतर्फे (म.रा.) देण्यात आलेल्या निवेदनावर पिंटूभाऊ दर्डा, भुसावळचे गणेश वाघ, भैय्यासाहेब माळी व इतर सदस्यांची नावे आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !