भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी आली समोर : खान्देशात मात्र उमेदवार बदलाची चर्चा


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपाच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी समोर आली आहे. एबीपी माझ्यासह अन्य माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार खान्देशातील जागांवरील उमेदवार बदलाची दाट शक्यता आहे तर ऐनवेळी विद्यमान उमेदवारांनाच तिकीट मिळू शकेल, असा अंदाज आहे. सर्वाधिक लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदारांना संधी मिळेल अथवा जळगावसाठी पर्यायी म्हणून ए.टी.नाना पाटील तर रावेरसाठी अमोल हरिभाऊ जावळे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

32 संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असून महायुतीमधील जागा-वाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे बोलले जात आहे. तशातच भाजपच्या 32 संभाव्य जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.




अशी असू शकेल भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी !

पुणे : मुरलीधर मोहोळ

धुळे : सुभाष भांबरे यांच्याऐवजी प्रदीप दिघावकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.

हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपच्या तानाजी मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता.

जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवले जाण्याची शक्यता.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नंदूरबार : हिना गावीत किंवा विजयकुमार गावीत

अकोला : संजय धोत्रे

ईशान्य मुंबई : मनोज कोटक

सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.

कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.

भंडारा -गोंदिया : सुनील मेंढे

बीड : विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे

माढा ः रणजितसिंह निंबाळकर

गडचिरोली : अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपच्या चिन्हावर लढू शकतात.

भिवंडी : कपिल पाटील

सांगली : संजयकाका पाटील यांच्याऐवजी काँग्रसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.

सातारा : उदयनराजे भोसले

जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए.टी.नाना पाटील.

दिंडोरी : भारती पवार

रावेर : रक्षा खडसे किंवा अमोल जावळे

उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला)

उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.

संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.

ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र, भाजपा घेण्यास आग्रही आहे )

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अजूनही वाद सुरु आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत )

दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर

नांदेड : मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली )

राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र, ते भाजपा पक्षप्रवेश करून भाजपा तिकीटावर लढतील अशी शक्यता आहे.

अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.

अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्षप्रवेश होईल. मात्र, नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हेदेखील आग्रही आहेत.

रावेरच्या जागेवर अमोल जावळेंचे नाव चर्चेत !
रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापले गेल्यास या जागेवर माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र व भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाने माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे ऐनवेळी नाव कापून आमदार खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना तिकीट दिले होते व त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत भाजपा श्रेष्ठी विद्यमान खासदार की अमोल जावळे यांना संधी देतात? याकडे राजकीय धुरीणांसह मतदारांचे लक्ष लागले आहे. चाळीसगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना तिकीट न मिळाल्यास ए.टी.नाना यांना तिकीट मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !