पंकजा मुंडेना पुन्हा संधी मिळणार ?


Will Pankaja Munde get another chance? छत्रपती संभाजीनगर :  नाराज नेत्यांसोबत जुळवून घेण्याची रणनीती भाजपाने आखल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या दौर्‍यावर आले होते. तत्पूर्वी त्यांनी भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यात शहा यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून मराठवाड्यातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी निवडून येण्याची क्षमता याच एकमेव निकषावर उमेदवार निश्चित करण्याचे निर्देश दिले. याद्वारे शहा यांनी एकप्रकारे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वालाच कौल दिला. यामुळे पंकजा मुंडे यांची बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता
पंकजा मुंडे गत साडेचार वर्षांपासून भाजपमध्ये पिछाडीवर पडल्या होत्या. पण आता अमित शहा यांच्या दौर्‍यामुळे त्या पुन्हा एकदा भाजपच्या पहिल्या फळीच्या नेत्यांत सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.




 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !