बोदवड येथे गटविकास अधिकार्‍यांची मागणी

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना निवेदन


Demand for Group Development Officers at Bodwad मुक्ताईनगर : गोदवड येथे गेल्या कित्येक महिन्यांनापासून गटविकास अधिकारी पद रीक्त असून शेजारच्या तालुक्यातील गटविकास अधिकारी प्रभारी म्हणून बोदवड पंचायत समितीचा कार्यभार पाहत असल्याने ग्रामीण भागातील विकासकामे खोळंबली आहेत तसेच बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक पद रीक्त असल्याने या संदर्भात दखल घेण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे केली

ग्रामसेवकांअभावी हाल
शासनाला जोडणारा पूल म्हणून ग्रामसेवक कार्य करत असतात परंतु बोदवड तालुक्यात 39 ग्रामपंचायतीसाठी केवळ सा आणि मुक्ताईनगर तालुक्यात 61 ग्रामपंचायतीसाठी 34 ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका ग्रामसेवकाकडे चार ते पाच ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे त्यामुळे ते प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाचा खेळखंडोबा झाला आहे.




गटविकास अधिकार्‍यांची मागणी
बोदवड पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकार्‍याची नियुक्ती नसून गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकारी हे बोदवड पंचायत समितीचा कार्यभार बघत आहेत त्यामुळे योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही. बोदवड तालुक्यातील ग्रामविकासावर त्याचा परीरणाम होत असून शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होत आहेत. बोदवड पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी गट विकास अधिकार्‍याची नियुक्ती करावी तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस विजय चौधरी, एनगाव सरपंच विनोद कोळी, मुक्तळ येथील जितेंद्र पाटील, शाम सोनवणे, अजयसिंह पाटील, अमोल पाटील, विलास चौधरी आदी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !