सांडपाण्यात फेकल्याने साडेतीन वर्षीय बालकाचा मृत्यू
Three-and-a-half-year-old boy dies after being thrown into sewage मालेगाव : शहरातील हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या समवेत खेळणार्या साडेतीन वर्षाच्या बालकाला सांडपाण्यात फेकल्याने बालकाचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून विधी संघर्षग्रस्त बालकाचा सुरू आहे.
सीसीटीव्हीतून घटना समोर
सांडपाण्याच्या डबक्याजवळ लहान मुले खेळत असताना एका तेरा वर्षीय मुलाने हस्सान मलीक मुदस्सीर हुसेन या साडेतीन वर्षाच्या मुलाला सांडपाण्याच्या डब्यात फेकून दिले त्यामुळे त्याच्यासोबत असलेली सर्व मुले घाबरली. त्यांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पवारवाडी पोलिस ठाण्यात विधी संघर्षग्रस्त बालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

