कर्जमुक्त योजनेतून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये


प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी यावलच्या बैठकीत दिल्या सूचना

यावल : शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतील पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये तसेच पात्र असलेल्या प्रत्येक शेतकर्‍यांना वेळेत योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी मंगहवारी यावल पंचायत समितीत झालेल्या बैठकीत दिल्या. कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या बळीराजाला आधार देणारी राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आहे. ही योजना प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत पोहोचवावी. या योजनेसंदर्भात विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी यावलला बैठक घेण्यात आली. पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली.

प्रांताधिकार्‍यांनी अशा सूचना केल्या
गावनिहाय शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांची यादी फलकावर प्रसिद्ध करणे, पोर्टलवर संबधित शेतकर्‍यांना स्क्रीनवर दिसणारे मान्य, अमान्य पर्यायांबाबतचा अर्थ शेतकर्‍यांना समजावून सांगणे, केंद्रचालकाने शेतकर्‍यांच्या तक्रारीची नोंद झाल्याबाबत व अशी तक्रार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पाठविली असल्यास शेतकर्‍यास सांगावे, अशा सूचना प्रांताधिकार्‍यांनी केल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !