स्वनियमन, स्वअनुषासन आणि स्वनियंत्रण मूल्यनिष्ठ पत्रकारीतेची त्रिसूत्री

डॉ.सोमनाथ वडनेरे : मूल्यनिष्ठ पत्रकारिता : काल, आज आणि उद्या विषयावर कार्यशाळा


सावदा : माध्यमांमध्येे नित्य नवीन प्रवाह येत आहेत, नवीन आयाम स्थापीत होत आहेत, अशा परीस्थितीत मूल्यनिष्ठ आणि सकारात्मक पत्रकारीता करण्यासाठी मीडियामध्ये स्वनियमन, स्वअनुशासन आणि स्वनियंत्रण या त्रिसूत्रीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी सावदा येथे प्रजापिता ब्राम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे आयोजित पत्रकारांचे कार्यशाळेत केले. प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विद्यालय सावदातर्फे ‘मूल्यनिष्ठ पत्रकारिता: काल, आज आणि उद्या‘ या विषयावर मंगळवार, 5 रोजी मीडिया कार्यषाळा घेण्यात आली. यावेळी मुख्य संबोधन ब्रहमाकुमारीज महाराष्ट्र् मीडिया प्रमुख, माउंट आबूचे डॉ.सोमनाथ वडनेरे (जळगाव) यांनी बोलत होते.

पत्रकारीतेचे व्यावसायीक स्वरूप
डॉ.वडनेरे आपल्या संबोधनात पुढे म्हणाले की, पत्रकारीता स्वातंत्र्यापूर्वी मिशन म्हणून कार्य करीत होती. ती आज प्रोफेशन अर्थात व्यावसायीक झाले आहे. मीडियाने उद्योगाचे स्वरूप धारण केलेले आहे. कालपरत्वे त्यात स्थित्यंतरे होणे स्वाभाविक असले तरी माध्यमांनी मूल्यांची कास धरून पत्रकारीता करावी तरच लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूत बनेल व सर्वसामन्य जनतेचा आवाज म्हणून काम करेल, असा आशावादही त्यांनी प्रसंगी व्यक्त केला. पीक पत्रकारीता ही समाजास लागलेली एक प्रकारे कीड आहे पण आपण सकारात्मक रहाणे गरजेचे आहे, आज माध्यमापुढे आव्हाने आहेत पण आपण सकारात्मक रहाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.




यांची उपस्थिती होती
प्रसंगी भानुदास भारंबे, प्रवीण पाटील, चंद्रशेखर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मिलिंद टोके, संतोष नवले, महेंद्र पाटील, शाम पाटील, पंकज पाटील, योगेश सैतवाल, जगदीश चौधरी, मिलिंद कोरे, राजेश चौधरी, दीपक श्रावगे, युसूफ शहा, फरीद शेख, कैलास लवंगडे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहत त्यांचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले.
सुरूवातीस केंद्र संचालिका ब्रहमाकुमारी वैषालीदीदी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार विकास फेगडे यांने तसेच सूत्रसंचलन दीपमाला यांनी केले. महाशिवरात्री महोत्सवानिमित्त सावदा येथे विविध वर्गासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात युवा संमेलन, शेतकरी मेळावा, महिला मेळावा व हळदी कुंकू असे कार्यक्रम होणार आहे. शासकीय विश्राम गृहासमोरील शिवस्मृती भवनात हे मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !