12 हजारांची लाच भोवली : कोपरगाव पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
12 thousand bribe: Both policemen of Kopargaon police station in ACB’s netकोपरगाव : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 12 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना कोपरगाव, जि.अहमदनगर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचार्यांना नाशिक एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
55 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे कामकाज हवालदार लांडे पाहत असूनया गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी लांडे यांनी कोतकर यांना भेटण्यास सांगितले व कोतकर याने तक्रारदार यांच्याकडे गुरुवार, 6 रोजी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली व 12 हजार रुपयात तडजोड झाली. कोपरगाव पोलीस ठाण्यात आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.


यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई नाशिक एसबीचे पोलीस निरीक्षक परशूराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, हवालदार सचिन गोसावी, नाईक विलास निकम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.