मोठी बातमी : जळगाव लोकसभेसाठी भाजपाकडून युवा नेतृत्व रोहित निकमांना संधी मिळण्याचे संकेत !


Big News: Indications of opportunity for youth leadership Rohit Nikam from BJP for Jalgaon Lok Sabha ! जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपाकडून अद्यापही राज्याची यादी जाहीर झाली नसताना भाजपाने 12 जागांवरील विद्यमान उमेदवार बदलाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या जागांवर भाजपाकडून धक्कातंत्राचा वापर करीत नवीन उमेदवार देण्यात येणार असून त्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव लोकसभेसाठी चाळीसगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कट झाल्यास भाजपाकडून युवा चेहरा असलेल्या रोहित निकम यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

….तर यांनाही मिळू शकते संधी
विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांच्या परीवारात उमेदवारी गेल्यास भाजपाला राजकीय पातळीवर मोठा संदेश देता येणार आहे शिवाय जमिनीशी नाळ जुळलेला कार्यकर्ता म्हणून रोहित निकम यांची ओळख आहे. सध्या बुथ कमेटीचे जिल्हाप्रमुख ते असल्याने प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी ग्राउंड लेव्हलवर त्यांचा संपर्क आहे. दरम्यान, विद्यमान खासदार उन्मेश पाटील वा रोहित निकम यांनी संधी न मिळाल्यास माजी खासदार ए.टी.नाना पाटील व माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नावाचाही विचार होवू शकतो, असेदेखील सूत्रांकडून समजते.




निकम परीवारात उमेदवारीनंतर भाजपाला देता येईल मोठा संदेश
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे संस्थापक माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू व विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांचे पुतणे असलेल्या रोहित निकम यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रीय पातळीवर मोठा संदेश देता येणार आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांचे राष्ट्रीय पातळीवरही मोठे नाव आहे शिवाय युवा कार्यकर्ता असलेल्या रोहित निकम यांचा दांडगा जनसंपर्कही आहे. सध्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून रोहित दिलीप निकम हे काम पाहत आहे.

निकम नावाभोवली मोठे सामाजिक वलय
रोहित निकम हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचचे संचालक, तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक ‘कृभको’मुबंई चे सदस्य आहेत तसेच इतर सहकार संस्थावर ते सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या मातोश्री शैलजा दिलीप निकम या जिल्हा बँकेच्या संचालक आहेत तसेच माजी जिल्हा परीषद सदस्याही आहेत. वडिल दिलीप निकम हे प्रगतीशील शेतकरी असून तर काका अ‍ॅड.उज्वल निकम हे राज्याचे विशेष सरकारी वकिल आहेत. एवढेच नव्हे तर, रोहित निकम यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम यांच्या नावाला जळगाव जिल्ह्यात एक वेगळं सामाजिक आणि राजकीय वलय आहे.

कुटूंबात राजकीय वारसा
आगामी लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघातून रोहित निकम यांचे नाव पुढे आले आहे. भाजपाने जळगाव व रावेरच्या जागेवरील उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यातच एबीपी माझा या वृत्तवाहिनीने देखील 12 जागांवरील विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याचे संकेत दिले आहेत. त्यात जळगावसह रावेरच्या उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, रोहित यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा मतदार संघातून 1955 ते 1959 ला आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे निकम परिवाराची नाळ अजूनही चोपडा तालुक्यात जुळून आहे तर दुसरीकडे रोहित निकम यांच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोतावळा जिल्ह्यात विस्तारलेला आहे. निकम हे आयटी सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचा थेट तरुणांशी संपर्क आहे शिवायबुथ कमेटीवरही ते काम करीत असल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींकडून पार्लमेंट्री बोर्डमध्ये रोहित निकम यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.

रावेर लोकसभेतही उमेदवार बदलणार !
रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी न मिळाल्यास या जागेवर माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र अमोल हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे. युवा नेतृत्व असलेले अमोल जावळे हे सध्या भाजपाचे पूर्व जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. विद्यमान खासदारांना पक्षाकडून संधी न मिळाल्यास अमोल जावळे यांचा नावाचा विचार होवून त्यांना संधी मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !