महिलादिनी स्त्री शक्तीचा भुसावळ विभागात सन्मान
Bhusawal Division honors women’s strength on Women’s Day भुसावळ : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरासह विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भुसावळ शहरात रक्तगट तपासणी शिबिर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले तर भुसावळ विभागात स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला.
कुर्हाकाकोडा महाविद्यालय
कुर्हाकाकोडा : स्थानिक प.पू.माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्ेद्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुर्हा काकोडा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा वि.पाटील, सीमा वि.चौधरी, प्रा.सायली यो.सुशिर, सोनाली कदम, श्रद्धा गावंडे उपस्थित होत्या. संस्थेचे कोषाध्यक्ष पुरणमलजी चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.पिंगळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.एस.एन. जोशी, कला विभाग प्रमुख प्रा.एम.के.वाघ उपस्थित होते. विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेमध्ये विजय झालेल्या विद्यार्थिनींना प्राचार्य पिंगळे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.भाग्यश्री ढगे व सूत्रसंचालन टी.वाय.बी.कॉमची विद्यार्थिनी पल्लवी पाटील तर एस.वाय.बी.कॉम.ची विद्यार्थिनी दीपाली बोरसे हिने तर आभार टी.वाय.बी.ए.ची विद्यार्थिनी वैशाली खवले हिने केले. यशस्वीतेसाठी प्रा.नयना सुरडकर, प्रा.साक्षी कुलकर्णी, प्रा.वृषाली शिमरे, प्रा.कविता पर्वते, प्रा.शीतल म्हस्के, प्रा गीता वाघ यांनी केले.



पुरुष-स्त्री यांच्यात साहचर्याची भावना असावी : नलिनी बाविस्कर वानखेडे
भुसावळ : आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आगे कूच केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्वतःचे अस्तित्व व ओळख निर्माण केली आहे. पूर्वीचा काळ व आता 21 व्या शतकात अमुलाग्र बदल झाले आहेत. स्त्री व पुरुष यांच्यात समानते सोबतच साहचर्याची भावना असली पाहिजे. यामुळे विभक्त होणारे कुटुंब एकत्रित नांदू शकत असल्याचे प्रतिपादन के.नारखेडे विद्यालयातील शिक्षिका नलिनी बाविस्कर वानखेडे यांनी केले. भुसावळ आगारात राष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. आगार प्रमुख राकेश शिवदे, भुसावळ स्थानकप्रमुख पी.बी.भोई, सहाय्यक कार्यशाळा प्रमुख सागर देवकर, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट च व्हॉईस चेअरमन सुनील वानखेडे आदी उपस्थित होते. चालक-वाहक व यांत्रिकी कामगार महिलांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभार कामगार प्रतिनिधी धर्मराज देवकर यांनी मानले.

हिंदी महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.रमेश जोशी अध्यक्षस्थानी होते. डॉ.रमेश जोशी मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिला या समाज्याच्या आधारस्तंभ आहेत. त्यांचे मोठे योगदान आहे. महिलांनी स्वस्थ जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. रोज व्यायाम प्राणायाम व मेडिटेशन यांचा आपल्या दैनिक दिनचर्येत समावेश केला पाहिजे जेणेकरून आपले स्वास्थ्य उत्तम व निरोगी राहील. प्रमुख वक्ता म्हणून डॉ.शीतल चोरडि होत्या. महिलांनी आपले स्वास्थ्य सुदृढ कसे राखावे त्यासाठी संतुलित आहारात विटामिन (ए.बी.सी.डी.ई.) चा समावेश कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.पूनम त्रिवेदी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे यांनी परिश्रम घेतले.





