चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची अमळनेर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आत्महत्या


Theft suspect commits suicide in Amalner police station lockup अमळनेर : चोरीच्या गुन्ह्यात मारवड पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने अमळनेर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घनश्याम भाऊलाल कुमावत (35, मूळ रा.दोंदवाडे, ता.चोपडा, ह.मु.डांगरी, ता.अमळनेर) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

चोरी प्रकरणात संशयित आरोपी
डांगरी येथे बकरी चोरी प्रकरणात संशयित घनश्याम यास अटक करण्यात आली तर तपासात संशयिताचा डांगरी -करणखेडे शिवारात तार चोरी प्रकरणात सहभाग आढळल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. संशयिताला अमळनेर न्यायालयाने 9 पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर मारवड येथे लॉकअप नसल्याने त्यास अमळनेर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.



चादर फाडून लावला गळफास
शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास संशयित शौचास गेल्यानंतर त्याने पांघरण्यास दिलेली चादर फाडून गळफास घेतला. बराच वेळ होवून संशयित आरोपी बाहेर न आल्याने गार्डने पाहणी केली असता आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !