भुसावळातील लाच प्रकरण : झेडआरटीआयच्या प्राचार्यासह लिपिकाची कोठडीत रवानगी
Bhusawla Bribery Case: Clerk sent to custody along with ZRTI Principal भुसावळ : भुसावळातील रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये भाडे तत्वावरील गाडीच्या लॉग बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना झेडआरटीआयच्या प्राचार्यासह लिपिकाला पुण्यातील सीबीआय पथकाने अटक केली होती. संशयितांची सीबीआय कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दोन्ही संशयीतांची भुसावळ येथील दुय्यम कारागृहात रवानगी करण्यात आली.


लाचखोर प्राचार्यांसह दोघे जाळ्यात
भुसावळ येथील रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडआरटीआय) भाडेतत्त्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी 9 हजारांची लाच स्वीकारताना प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेशचंद्र जैन, कार्यालय अधीक्षक (निविदा) योगेश देशमुख यांना सीबीआय पथकाने बुधवार, 6 मार्च रोजी अटक केली होती. या दोन्ही संशयितांना गुरुवार, 14 मार्च रोजी न्यायालयाने दोन दिवस सीबीआय कोठडीत सुनावली होती तर दोन दिवस पूर्ण झाल्यावर शनिवारी दोन्ही संशयीतांना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जैन व देशमुख यांची रवानगी भुसावळ येथील दुय्यम कारागृहात करण्यात आली. याबाबत सीबीआय अधिकार्यांनी याबात काहीही माहिती देण्यास नकार दिला.