भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण

अत्याधूनिक साहित्यामुळे 24 तासात केव्हाही शवविच्छेदन शक्य


Inauguration of Autopsy Room at Bhusawal Trauma Centre भुसावळ : राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भुसावळ शहरात ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर असलेतरी अत्याधूनिक साहित्याअभावी रात्री-बेरात्री शवविच्छेदनास अडचणी निर्माण होत्या. ही बाब लक्षात घेता आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यातून अत्याधूनिक साहित्याची उपलब्धतता झाल्याने शवविच्छेदन कक्षाचे आमदारांच्या उपस्थितीत शनिवारी लोकार्पण करण्यात आले.

आपत्कालीन वेळेत शवविच्छेदन शक्य
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला परंतु शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची कमतरता असल्याने तेथे कार्यरत डॉक्टरांना बर्‍याच वेळेस अडचणीचा सामना करावा लागत होता. शासनातर्फे नवीन व अत्याधूनिक पी.एम.टेबल, बॉडी फ्रिझर, पी.एम ट्रॉली, विविध अवजारे, वजन काटा आदी अत्याधुनिक सामुग्री मिळाल्याने शवविच्छेदनासाठी कमी वेळ लागणार आहे. तसेच मयतांच्या नातेवाईकांना व पोलिसांना मृतदेहाच्या विच्छेदनासाठी तात्काळत उभे राहावे लागणार नाही. शिवाय आता आपत्कालीन वेळेत रात्रीही शव विच्छेदन करण्यास अडथळा येणार नाही.



यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी (निवासी) डॉ.सुशांत सुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ. नि.तु.पाटील, डॉ.सनी जैन, डॉ.आसीफ पठाण, डॉ.कोटेचा, डॉ.रामवंशी तसेच भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, मुकेश पाटील, सतीश सपकाळे, पवन बुंदेले, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, धनराज बाविस्कर, विशाल जंगले, रेहमान शेख, कैलास पाटील, सागर जाधव आणि सर्व कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !