पारोळा तालुक्यात अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार : 28 वर्षीय तरुणाला अटक
Abuse of a minor in Parola taluka : 28-year-old arrested पारोळा : पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात काम करून गुजराण करणार्या गरीब कुटूंबातील नऊ वर्षीय चिमुकलीवर 28 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना पारोळा तालुक्यात रविवार, 10 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात संशयित हिरालाल अमरसिंग बारेला (28, चोपडा तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पारोळा तालुक्यातील एका शेतात रविवार, 10 मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नऊ वर्षीय पीडीतेवर संशयित हिरालाल अमरसिंग बारेला याने अत्याचार केला तर पीडीतेच्या भावाला लिंबू घेण्यासाठी बाहेर पाठविले. हा प्रकार पीडीतेने आईला सांगितल्यानंतर पीडीतेसह आाईने पारोळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहे.

