पथराडे येथे 65 वर्षीय महिलेला पाच जणांची मारहाण


A 65-year-old woman was beaten up by five people in Patharade यावल : यावल तालुक्यातील पथराडे गावाच्या शेतशिवारात कापसाच्या पिकातून ट्रॅक्टर घेऊन जाताना बोलण्याचा राग आल्याने 65 वर्षीय महिलेला पाच जणांनी जातीवाचक शिवीगाळ केली व मारहाण केली. ही घटना नोव्हेबर 2022 मध्ये घडली होती. याप्रकरणी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावरून यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
पथराडे, ता.यावल शेत शिवारात शेत गट क्रमांक 80 मध्ये 26 नोव्हेंबर 2022 रोजी एक मागासवर्गीय समाजाच्या 65 वर्षीय महिलेने शेतात कापूस लावला होता. या कापसाच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन काही जण जात असताना महिलेने शेतातून ट्रॅक्टर का नेले ? अशी विचारणा केली असता त्याचा राग येवून महिलेला संशयित दगूबाई संतोष पाटील, भूषण संतोष पाटील, शालुबाई सुभाष पाटील, कल्पेश सुभाष पाटील व ईश्वर उर्फ भूरा लक्ष्मण पाटील या पाच जणांनी जाती-वाचक शिविगाळ करून मारहाण केली. वृद्धेने याबाबत थेट भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात फिर्याद दाखल केली. भुसावळ न्यायालयाच्या आदेशाने यावल पोलिसात पाच जणाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !