वाकडीतील 13 वर्षीय बालकाचा बैलगाडीखाली आल्याने मृत्यू
A 13-year-old boy from Vakadi died after falling under a bullock cart जळगाव : शेतातून बैलगाडीवर निघालेल्या बालकाचा बैलगाडी उलटल्यानंतर डोक्याला विळा लागल्याने मृत्यू झाला. ही घअना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक घडली. गौरव आनंदा पाटील (13, रा.वाकडी, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
डोक्यात विळा शिरल्याने बालकाचा मृत्यू
म्हसावदच्या थेपडे गावातील शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारा गौरव पाटील हा बालक आपल्या आई-वडील, भाऊ आणि बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी तो शेतात बैलगाडीने गेला असता चारा घेवून येत असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैलगाडी उलटी झाली. यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात शिरल्याने गौरव पाटील हा जागीच ठार झाला.


यावेळी शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला तातडीने बालकाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.