मुक्ताईनगर मतदारसंघातील जि.प.शाळेत शिक्षकांच्या अखेर नियुक्त्या
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना पाठपुराव्याला यश
Final appointment of teachers in G.P. School in Muktainagar Constituency मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर या तीन तालुक्यांमधील जिल्हा परीषदेच्या शाळेत बर्याच दिवसांपासून शिक्षकांची पदे रीक्त होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा करून यासंदर्भात निवेदनदेखील दिली होती. वेळोवेळी शिक्षण मंत्री यांच्याकडे देखील तगादा लावलत शाळेची रीक्त पदे न भरल्यास शाळेला कुलूप लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पाठपुराव्याची दखल घेत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, रावेर या तीन तालुक्यांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या एक ते दीड वर्षापासून ही शिक्षकांची पदे रीक्त होती.
आमदारांच्या पाठपुराव्याने तिढा सुटला
मुक्ताईनगर तालुक्यातीलच 132 शिक्षकांची पदे ही रीक्त होती. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील या शाळांना शिक्षक मिळालेले आहेत. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे या शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली असून यामध्ये मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील शिक्षकांची पदे भरण्यात आली.



नियुक्त शिक्षकांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यात-मराठी पदवीधर शिक्षक 6, उर्दू पदवीधर शिक्षक 3, मराठी उपशिक्षक 65, व उर्दू उपशिक्षक 8 तर बोदवड तालुक्यात- 14 उपशिक्षक मराठी, सात पदवीधर शिक्षक मराठी व एक उपशिक्षक उर्दू तसेच रावेर तालुक्यात 55 उपशिक्षक मराठी तसेच तीन उर्दू शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकाकडून आमदार चंद्रकांत पाटील यांचे कौतुक होत आहे.





