जरांगेंचा फडणविसांना इशारा : माझ्या नादी लागल्यास तुमचा सुपडा साफ होणार !
Jarang’s warning to Fadvanis: If my nadi is heard, your supada will be cleared! परभणी : फडवणीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटत आहात, तुमचा सुपडासाफ होईल असे मराठा समाजाचे नेते जरांगे यांनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष अधिकच तीव्र होत असताना जरांगे हे परभणी दौर्यावर असताना त्यांनी फडणवीस यांना इशारा दिला.
परभणीत संवाद बैठकीचे आयोजन
परभणीच्या मानवत शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात रविवारी मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. ”नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी मारली, तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का? असा सवाल जरांगेंनी फडणवीसांना विचारला. महत्वाचे म्हणजे फडवणीस मला संपवणार आहेत. त्यांना देव मानणार्या एकाने मला ही बाब सांगितली आहे”, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे. तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे पालकत्व स्वीकारलेले आहे. त्यांनी तुरुंगात टाकण्याचा डाव आखला आहे. मात्र त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही” असेही जरांगे म्हणाले.



छगन भुजबळ आठ दिवसापासून गार पडले आहेत. हिमालयात जाऊन बसले आहेत का? असे म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांना डिवचले आहे.
ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, एक इंचही मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच फडणवीस यांनी गुंडगिरी, पदाचा गैरवापर करून दहशत दाखवली तर ही दहशत मोडण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल, असेहीते म्हणाले. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असे आक्रमक भाषण जरांगे यांनी केले. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल” असे जरांगे म्हणाले.





