कळवणचा लाचखोर प्रभाग समन्वयक नाशिक एसीबीच्या जाळ्यात
Kalwan’s bribery ward coordinator in Nashik ACB’s net कळवण : चार हजार आठशे रुपयांची लाच स्वीकारताना कळवण, जि.नाशिक येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे प्रभाग समनवयक देविदास सयाजी चव्हाण यांना नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.
य लाचेची मागणी-
असे आहे लाच प्रकरण
31 वर्षीय महिला तक्रारदाराच्या बँक खात्यात केलेल्या कामाचे तीन महिन्याचे 16 हजार 800 रुपये जमा झाले त्याचे मोबदल्यात स्वतःसाठी व त्यांच्या वरीष्ठांसाठी 16 हजार 800 रुपये जमा केल्यापोटी लाच म्हणून चार हजार आठशे रुपयाींच मागणी 6 मार्च रोजी कार्यालयात करण्यात आली तर 11 रोजी ग्रामपंचायत कनाशी भक्त निवास पाच पांडव मंदिर हॉल येथे लाच स्वीकारताच संशयीताला अटक करण्यात आली. अभोणा पोलीस स्टेशनल गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, हवालदार शरद हेंबाडे, महिला पोलीस अंमलदार शीतल सूर्यवंशी आदींनी हा सापळा यशस्वी केला.