वरणगाव शहरातील पाणीप्रश्नी जिल्हाधिकार्‍यांची माजी नगराध्यक्षांनी घेतली भेट


The former mayor met the water issue collector of Varangaon city वरणगाव : वरणगाव शहरातील पाणीप्रश्नाबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली.

वरणगाव शहरात 18 दिवसांनी पिण्याचे पाणी येत असल्यामुळे नागरीकांची पाण्यासाठी भटकंती होत असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने ते काम जलद गतीने करून नारीमाळा व शिवाजीनगरातील पाण्याच्या टाकीचे काम आठ दिवसाचे आत पूर्ण करावे तसेच नवीन पाणी पाण्याच्या टाकीद्वारे पिण्याचे पाणी शहराला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, डॉ.प्रवीण कुमार चांदणे, शेख जावेद शहा यांची उपस्थिती होती.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !