पैसे न दिल्याने मारहाण करीत मोबाईल लांबवला : तरुणीसह जळगावातील त्रिकूट जाळ्यात
For non-payment, mobile phone was beaten and taken away : Jalgaon trio with young woman in the net जळगाव : रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाकडे दुचाकीस्वार दोन पुरुषांसह एका तरुणीने पैशांची मागणी केली मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण करीत त्याच्या मोबाईल जबरीने हिसकावण्यात आला. हा प्रकार रविवार, 10 मार्च रोजी घडला. जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या 24 तासात तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे लूट प्रकरण
जळगाव शहरातील निमखेडीरोड परीसरात अक्षय विलास शेलार (28) हा तरुण रविवार, 10 मार्च रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे कामानिमित्त आला होता. तो रस्त्याने पायी जात असतांना मागून दुचाकीवर आलेले अज्ञात दोन पुरूष आणि तरुणीने त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच काही कळण्याच्या आत त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून ते तेथून अग्रवाल चौकाकडे पळून गेले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


24 तासात आरोपी जाळ्यात
गुन्हे शोध पथकातील जुबेर तडवी व अमित मराठे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांच्या पथकाने संशयित शेख अजरुद्दीन शेख हुस्नोद्दीन उर्फ भुतपलीत (32, रा. शाहुनगर), मंगल सोमा सोनवणे (28, रा.पिंप्राळा हुडको) व जया जुलाल जाधव (28, रा. सिद्धार्थ नगर, पिंप्राळा हुडको) या संशयितांना सोमवार, 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला.