जळगावात दोघा भावांच्या खिशातून रिक्षा चालकासह साथीदाराने पाच हजार लूटले


In Jalgaon, an accomplice along with a rickshaw driver looted five thousand from the pockets of two brothers जळगाव : रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने दमदाटी करत मारहाण करीत दोघा भावांच्या खिशातून पाच हजाराची रोकड लूटली. रविवार, 10 रोजी रात्री 12.15 वाजता ही घटना खेडी पेट्रोलपंपाजवळ घडली. याप्रकरणी सोमवार, 11 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

असे आहे लूट प्रकरण
निलेश रामलाल शिलाले (19, रा.रामटेक म.प्र.ह.मु. रायपूर ता.जळगाव) हा भावासह खेडी पेट्रोल पंपाजवळ उभा होता. महामार्गावरुन येत असलेली प्रवासी रिक्षा शिलाले बंधूजवळ थांबली. रिक्षा चालक तसेच त्याचा एक साथीदाराने निलेश तसेच त्याच्या भावाच्या खिशातून जबरीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच शिलाले बंधूना चालकासह साथीदाराने मारहाण करत दमदाटी केली.



त्यानंतर खिशात हात टाकून पाच हजाराची रोकड काढुन घेत रिक्षासह दोघे पसार झाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी जावून माहिती घेतली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !