आमदार मंगेशदादांच्या प्रयत्नांना यश : राज्यातील पोलीस पाटलांना आता 15 हजारांचे मानधन
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शब्द पाळला ः आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या प्रयत्नांना यश
Success of MLA Mangeshdad’s efforts: Police Patals in the state now get 15,000 honorarium चाळीसगाव : पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता गावाच्या रक्षणासाठी त्यांनी काम केलं आहे. मात्र त्यांना मिळणारे साडेसहा हजार हे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. यासाठी पोलीस पाटील संघटनांच्या वतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अधिवेशनादरम्यान मोर्चे काढण्यात आले, अनेक शासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या. अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस पाटील यांचे मानधन 6500 वरून थेट 15000 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्र्यांनी पाळला शब्द
गुरुवार, 7 मार्च रोजी चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री गिरीश हाजन आले असता तालुक्यातील पोलीस पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे तुमच्या विषयाबाबत अतिशय सकारात्मक असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मानधनवाढीचा निर्णय झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल सर्व पोलीस पाटील संघटनांच्या वतीने त्यांचे व यासाठी पाठपुरावा करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.



कायदा सुव्यवस्था दृष्टीने महत्वाच्या घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला – आमदार मंगेश चव्हाण
पोलीस व गाव यातील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात, अनेक कठीण प्रसंगात त्यांची मोलाची मदत प्रशासनाला होत असते मात्र त्यांना मिळणारे अतिशय अल्प मानधन व शासनाकडून कुठल्याही भरीव सुविधा त्यांना मिळत नसल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी माझा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मागील काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सन 2019 मध्ये पोलीस पाटील यांचे मानधन 3000 वरून दुप्पट 6500 करण्यात आले होते मात्र नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत ही वस्तुस्थिती होती, त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हेच पोलीस पाटील वर्गाला न्याय देऊ शकतात याचा मला विश्वास होता. आज अखेर भरघोस अशी मानधनवाढ करण्याचा मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाल्याने ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था सांभाळणार्या एका जबाबदार घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.





