मलबार हिलला मालकिनीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला भुसावळात बेड्या
रेल्वे लोहमार्ग, आरपीएफ व भुसावळ बाजारपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई
Malabar Hill Mistress Murder Accused Shackled in Bhusawal भुसावळ : मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापीया हाईटस्, पेपिअन्सो रोड भागात घर मालकिनीचा तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्यांसाठी खून करून पसार झालेल्या आरोपीच्या बुधवारी भुसावळात मुसक्या आवळण्यात आल्या. रेल्वे लोहमार्ग, आरपीएफ व बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई आरोपी कन्हैय्या कुमार संजय पंडित (19, बिहार) यास डाऊन रक्सोल एक्स्प्रसमधून अटक केली.
दोन दिवसांपूर्वीच कामावर अन केला खून
मलबार हिल पोलीस ठाणे हद्दीतील ज्वेलरी व्यावसायीक मुकेश गुलाबचंद शहा (67, मलबार हिल, मुंबई) यांच्याकडे संशयित संजय पंडित हा 11 मार्च रोजी कामाला लागला होता. शहा हे मुलीसह मंगळवार, 11 रोजी दुकानावर असताना घरी त्यांच्या पत्नी ज्योती शहा (67) व नोकर कन्हैय्या कुमार होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून आरोपीने घर मालकिण ज्योती यांचा गळा आवळला व त्यांच्या हातातील तीन लाख रुपये किंमतीच्या हिरेजडीत बांगड्या चोरून पळ काढला. सायंकाळच्या सुमारास ज्योती यांना फोन लावल्यानंतर त्या प्रतिसाद नेत नसल्याने खातरजमा केल्यानंतर खुनाचा प्रकार उघड झाला व नोकर पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


वर्णनाावरून केली अटक
संशयित डाऊन 15548 एलटीटी-रक्सोल एक्स्प्रेसमधून पसार झाल्याची माहिती त्याच्या छायाचित्रासह भुसावळातील यंत्रणांना कळवण्यात आल्यानंतर आरपीएफ, लोहमार्ग पोलिीस आणि बाजारपेठ पोलिसांच्या संयुक्त टिमने भुसावळनजीक संशयिताच्या एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून मुसक्या आवळल्यात. भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक गजानन पडघण, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मगरे व आरपीएफचे निरीक्षक आर.के.मीना, आयपीएफ निरीक्षक शेख व सहकार्यांनी ही कारवाई बुधवारी संध्याकाळी ही कारवाई केली.