अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरासाठी 50 लाखांचा निधी मंजूर
भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश : भाविकांमधून आनंद
50 lakhs sanctioned for Shri Jagannath Maharaj Temple at Anjale यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथील श्री क्षेत्र जगन्नाथ महाराज संस्थानाच्या मंदिरात कीर्तन सभागृह बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या पुढाकाराने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय यांच्या वतीने या निधीला मंजुरी देण्यात आली. लवकरच प्रत्यक्षात या ठिकाणी आता कीर्तन सभागृह बांधकामाला सुरूवात होणार असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून भाविकांनी अमोल जावळे यांना धन्यवाद दिले आहेत.
अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश
अंजाळे, ता.यावल येथे श्री जगन्नाथ महाराज देवस्थान आहे. या देवस्थानाच्या मंदिरात कीर्तन सभागृह बांधले जावे, अशी मागणी भाविक, भक्तांकडून करण्यात आली होती. भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता व यासाठीचा निधी पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. श्री जगन्नाथ महाराज संस्थान मौजे अंजाळे येथे कीर्तन सभागृहासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीला आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.



दिड कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी
रावेर तालुक्यातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील मंदिरास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून 75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तामसवाडी, ता.रावेर येथे सभा मंडपासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला असून सुशोभीकरणासाठी अतिरीक्त 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत शिवाय अंजाळे, ता.यावल येथे कीर्तन सभागृहासाठी 50 लाख तर मंगळूर, ता.रावेर येथे पुरातन शिव मंदिर सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दिड कोटींच्या कामांना अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून मान्यता मिळाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





