अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी बोदवडला ठिय्या आंदोलन

मुख्याधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे ः तीन दिवसात होणार कारवाई


Bodwad held protest to demolish unauthorized slaughterhouses बोदवड : बोदवड शहरातील सर्व अनधिकृत कत्तलखाने बंद करावेत या मागणीसाठी हिंदू बांधवांतर्फे बोदवड नगरपंचायतीवर बुधवार, 13 मार्च रोजी विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील अग्रसेन भवन ते नगर पंचायतीदरम्यान विविध घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी तातडीने शहरातील अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी नगरपंचायतीसमोर ठिय्या मांडला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आंदोलक ठिय्या मांडून होते. यावेळी मुख्याधिकार्‍यांनी सर्व कत्तलखान्यांची पाहणी करीत संबंधिताना नोटीसा बजावल्या तर तीन दिवसा कत्तलखान्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दोषी पोलिसांवरही कारवाईची मागणी
नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मुख्याधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहरातील अनाधिकृत असलेले कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करावेत, बोदवड पोलिसांकडून गोरक्षकांना मारहाण झाली असून बोदवडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, कॉन्स्टेबल शशिकांत शिदे यांचे निलबंन करावे, त्या गुन्हेगारांचे वाहन जप्त करून गुन्हे दाखल करावेत तसेच शहरातील मोकाट फिरत असलेल्या गोवंशाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर संजय शर्मा, अमोल शिरपूर, विनोद शर्मा, धनराज सुतार, देवेश माळी, शुभम रुमतकर, ओम गुजर, संजय अग्रवाल, गणेश शर्मा यांच्यासह शेकडो समाजबांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !