रावेर बाजार समितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन
कृउबाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध : सभापती सचिन पाटील
Bhoomipujan of various development works in Raver Bazar Committee रावेर : बाजार समिती शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी झटत असून बाजार समितीचा विकास करण्यासाठी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. बाजार समितीच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचा आनंद असल्याचे मत सभापती सचिन पाटील यांनी विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले.
बाजार समितीकडून दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भूमिगत पाण्याची टाकी आदी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच झाला. कृषी विकास योजने अंतर्गत एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाचे लोकार्पण बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, तहसीलदार बी.ए.कापसे यांच्याहस्ते कऱण्यात आले.


यांची होती उपस्थिती
यावेळी तहसिलदार बी.ए.कापसे, बाजार समितीचे संचालक डॉ.राजेंद्र पाटील, उपसभापती योगेश पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, बाजार समिती संचालक योगीराज पाटील, प्रल्हाद पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पितांबर पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, विलास चौधरी, सोपान पाटील, पंकज पाटील, सिकंदर तडवी, जयेश कुयटे, रोहित अग्रवाल, सचिव गोपाळ महाजन, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
प्रसंगी सभापती सचिन पाटील यांनी सभापती पदाच्या वर्षभराच्या काळात केलेल्या विविध विकास कामांसंबंधी माहिती दिली. यावेळी योगीराज पाटील, राजेंद्र पाटील यांनी सचिन पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील यांनी तर आभार गोपाळ महाजन यांनी मानले.
