दहिवदच्या सरपंच सुषमा देसले यांचा ‘पॉवरफुल वुमन’ पुरस्काराने गौरव


Sarpanch of Dahiwad Sushma Desale honored with ‘Powerful Woman’ award अमळनेर : दहिगाव ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सुषमा वासुदेव देसले पाटील यांना लोकमत वृतपत्र समूहाचे वतीने ‘पॉवरफुल वुमन’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार नाशिक विभागातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत , सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी, जयंती कठाले व नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हॉटेल ताज गेटवे नाशिक येथे अतिशय दिमाखात प्रदान करण्यात आला.

प्रभावी कार्याची दखल
सुषमा पाटील यांनी प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच दहिवद, विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई , संचालक कृषी उत्पन्न बाजारसमिती अमळनेरया पदावर कामअतिशय धैर्याणे तसेच प्रभावाने कार्य करीत जनतेला न्याय दिला आहे. महिला हिताच्या कामांसह इतरांनी गावविकासात केलेला अडथळा न जुमानता त्यांच्या विरोधातही गावविकासाची कामे तसेच महिला साबलीकरण, मेगा वृक्षारोपण , जि.प.प्राथमिक शाळा सुधारणा व विकास कार्य, पाणी समस्या आरोग्य व शेतकरी हित यावर प्रामाणिक पारदर्शक प्रभावी कार्य केल्याने या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.




सुषमा देसले यांना यापूर्वी असंख्य संस्था, संघटना, मंच यांच्याडून कार्याची दखल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. पुरस्कारानंतर त्यांचे मंत्री अनिल पाटील, सरपंच परीषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, अशोक पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !