भुसावळातील अतिक्रमणावर दोन महिन्यात दुसर्‍यांदा फिरवला जेसीबी

गोरगरीब व्यावसायीक पुन्हा उघड्यावर : धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर व्हावी कारवाई : वसंत टॉकीजसह दुकानां सील


JCB moved for the second time in two months on encroachment in Bhusawal भुसावळ : पालिकेने जानेवारी महिन्यात शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होताच बुधवार, 13 मार्च रोजी शहर हद्दीतील अतिक्रमणावर पुन्हा ताफा नेत जेसीबी फिरवल्याने गोरगरीब व्यावसायीक पुन्हा उघड्यावर आले आहेत. सातत्याने गोरगरीबांच्या अतिक्रमणावर हातोडा पडत असताना धनाढ्य व्यावसायीकांच्या पक्क्या अतिक्रमणावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य करदाता उपस्थित करीत आहेत. शहरात वर्दळीच्या रस्त्यांसह कॉलनी भागातही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असल्याने पालिकेने संपूर्ण शहराचा सर्वे करून सर्वच भागातील अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बुधवारच्या कारवाईत वसंत टॉकीजला सील लावण्यासह अन्य तीन दुकाने सील करण्यात आली तर 15.32 लाखांची थकबाकी वसुली करण्यात आली.

वर्दळीच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
बुधवार, 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पालिका ताफा जेसीबी मशीन, टॅक्टरसह तहसीलबाहेर धडकला. यावेळी अचानक तहसीलबाहेर टपर्‍या उचलण्याच्या सूचना करण्यात आल्यानंतर व्यावसायीकांची धावपळ उडाली. हजर असलेल्या व्यावसायीकांना टपर्‍या हलवता आल्या मात्र जागेवर व्यावसायीक नसल्याने अनेकांच्या टपर्‍यावर जेसीबी फिरवण्यात आला. पथकाने गांधी पुतळा ते साईजीवन या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील असलेले टपर्‍या, हातगाड्या हटवल्या तसेच गांधी पुतळा ते शहर पोलीस ठाण्याच्या मार्गावरील हातगाड्या, न्यायालयामागील अतिक्रमण तसेच आरपीडी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले. सुमारे 15 वर टपर्‍यांवर जेसीबी फिरवण्यात आला.




वसंत चित्रपटगृहाला ठोकले सील
भुसावळातील नामांकीत वसंत टॉकीजकडे सुमारे 45 लाखांची थकबाकी वाढल्यानंतरही संबंधित सूचनेला केराची टोपली दर्शवत असल्याने बुधवारी दुपारी बुधवारी प्रशासक व पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी वसंत टॉकीजला सील लावताच मोठी खळबळ उडाली आहे. वसंत टॉकीज प्रमाणे बड्या थकबाकीदारांची यादी बनवून महिना अखेरपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आपले गजाभाऊ ओक चौकातील वरच्या मजल्यावर असलेल्या दिलीपकुमार कोटेच्या यांच्याकडे दोन लाखांपेक्षा जास्त कराची थकबाकी असल्याने तीन दुकानांना सील लावण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !