जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा : भाजपाचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही !
Jarange Patal’s warning again : BJP will not allow any MP to be elected! बीड : आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा एकही खासदार निवडून येऊ देत नाही, असा धमकीवजा इशाराज मनोज जरांगे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बीडमधील वडवणी येथील सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
यांचा कुणीही खासदार निवडून येऊ देणार नाही
मनोज जरांगे म्हणाले की, मी वडवणी मधून जाहीर आव्हान करतो, तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर यांचे 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही. दुसरे कुणीही निवडून द्या पंरतु यांचा कोणीही निवडणून येऊ द्यायचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.



एकट्या फडवणीस यांनी समाज वेठीस धरला आहे. पण गाठ माझ्याशी आहे. सहा कोटी मराठा तुडवून माझ्याकडे यावे लागेल. तुम्हाला जे करायचे ते करा, मला जे करायचे ते मी करेल. पण तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवेल. फडवणीस यांनी कितीही बदनाम केले समाजापासून हटत पण मी घाबरून तुमच्या बाजूने मेलो तरी येणार नाही.
भाजपचे लोक माझ्याविषयी बनावट व्हिडीओ तयार करत असून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. मी मराठा समाजापासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे की मनोज जरांगे पाटलांनी घाबरु नये. यावेळी जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांवरही टिका केली.





