भुसावळात शॉर्ट सर्किटने ट्रान्सफॉर्मरला आग : शिक्षक कॉलनीत एसी, फ्रिजस टीव्ही खाक


Transformer caught fire due to short circuit in Bhusawal: AC in teacher’s colony, fridges TV broken
भुसावळ :
शहरातील शिक्षक कॉलनीतील मारोती मंदिराच्या आवारात असलेल्या ट्रॉन्सफॉर्मरने (डीपी) पेट घेतल्याने या परिसरात सुरू असलेले पाच टीव्ही, चार फ्रिज, पाच एसी, 35 पेक्षा जास्त लाईट, पाण्याचे पंप, संगणक जळाले आहे. ही घटना गुरूवारी संध्याकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे या भागातील रहिवाशांचे सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. या भागातील ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणावर झाडे व वेलींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात अन्य भागात सुध्दा कमी जास्त प्रमाणात हा प्रकार नित्याने होत असतो. याकडे वीज कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

शॉर्ट सर्किटने पेटली डीपी
शांती नगरातील शिक्षक कॉलनी भागात असलेल्या मारोतीच्या मंदिराच्या आवारात वीज कंपनीची डीपी बसविली आहे. या डीपीवर मोठ्या प्रमाणावर झाडे व वेली वाढलेल्या आहे. डीपीवर वाढलेल्या वेलींमुळे तेथे शॉटर्किट होताच डीपीने पेट घेतला. डीपीने पेट घेताच या भागातील अनेक घरांमध्ये सुरू असलेले टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, संगणक व लाईट जळून खाक झाले. वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे या भागात अंधार होऊन एकच खळबळ उडाली. या भागातील रहिवाशांनी वीज कंपनीला फोनवर माहिती दिल्यावर कंपनीचे आधिकारी तेथे दाखल झाले. रात्री वीजपुरवठा सुरू झाल्यावर घरातील उपकरणे जळाल्याचे समोर आले.



पाण्याचा दिवस आणि पंप जळाले
गुरूवारी शिक्षक कॉलनीत पाण्याचा दिवस असल्याने त्या भागात पाणीपुरवठा नुकताच आला. त्यावेळी खंडित झालेल्या वीजपुरवठ्याने आलेला पाणीपुरवठाही बंद झाला. नळांना पाणी आले मात्र वरच्या टाकीत पाणी पोहोविण्याची मोठीच गैरसेाय झाली. पाण्याचे पंपही या भागात जळाले त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

वीज कंपनीकडे करणार तक्रार
रात्री झालेल्या प्रकारामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ग्राहक वीज कंपनीकडे नुकसान भरपाई मागणार आहे. वारंवार तक्रार करून सुध्दा डीपीवरील वेली, वाढलेली झाडे काढली नाही त्यामुळेच हे शॉटसर्किट झाले. वीज कंपनीने नुकसान भरपाई8 दिली नाही तर सर्व नुकसानग्रस्त नागरिक ग्राहक मंचमध्ये तक्रार करतील, असे रवींद्र भोळेसह त्या भागातील नागरिकांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !