जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू


Model code of conduct applicable in Jalgaon district जळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने काल १६ मार्च रोजी लोकसभा 2024 सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर असून यांनतर देशभरात आचारसंहिता लागू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात निवडणूकीची आचार संहिता सुरु झाली असून या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.

अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी. दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !