चाळीसगावनजीक भीषण अपघात : दोघे परप्रांतीय मजूर ठार

मजुरांना नेणार्‍या डंपरची माल वाहतूक करणार्‍या वाहनाला धडक : 17 मजूर जखमी


Fatal accident near Chalisgaon : Two migrant laborers killed चाळीसगाव : मजुरांना नेणार्‍या भरधाव डंपरने माल वाहतूक करणार्‍या वाहनाला धडक झाल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात दोघा परप्रांतीय मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 17 मजूर जखमी झाले. हा अपघात मंगळवार, 19 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास हिरापूर गावाजवळील अरमान हॉटेलजवळ हा अपघात घडला. या अपघातात 17 मजूर किरकोळ जखमी झाले असून अपघातानंतर डंपर चालक पसार झाला.

दोघे परप्रांतीय ठार
या अपघातात सोनीबाई सोमनाथ यादव (30, रा.तिनगडा, ता.जि.कबीरनाथ छत्तीसगड) व सरस्वती रामप्रसाद उईके (17, रा.दामितितराहि, ता.जि.डिडोरी म.प्र.) यांचा मृत्यू ओढवला.



काम आटोपताच गाठले मृत्यू
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथे तिसर्‍या रेल्वे लाईनच्या कामाच्या परप्रांतीय मजूर काही दिवसांपासून काम करीत होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर मजुरांनी आपापल्या गावाकडे जाण्यासाठी तयारी केली व त्यांना बुधवार, 20 रोजी भुसावळ येथून कटनी पॅसेंजर असल्याने मंगळवार, 19 रोजी रात्री 9.30 वाजता सर्व मजुरांनी घरगुती सामान डंपर (एम.एच.05 के.9936) मध्ये टाकत भुसावळचा प्रवास सुरू केला मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास हिरापूर गावापुढे अरमान हॉटेल जवळ चाळीसगावकडून नाशिकला भाजीपाला घेवून जात असलेली महिंद्रा मॅक्सीमो माल वाहतूक (एम.एच.20 सी.जी.4429) वाहनाला डंपरने धडक झाल्यानंतर दोघे वाहने रोडावर पलटी झाली. या अपघातात डंपरमधील मजूर सोनीबाई सोमनाथ यादव व सरस्वती रामप्रसाद उईके या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात दोघा वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !