पूर्व वैमनस्यातून नाशिकमध्ये तरुणाचा खून
Youth killed in Nashik due to pre-existing enmity नाशिक : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकावर चौघा संशयित आरोपींनी पोटावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. ही घटना सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमाराला घडली. या घटनेत निलेश श्रीपद उपाडे (21, दिंडोरी नगर, कालिका नगर, नाशिक) या तरुणाचा मृत्यू ओढवला. खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जुन्या वादातून तरुणाचा खून
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला मयत निलेश हा त्याचा मित्र उमेश साबळे याच्या समवेत गप्पा मारत असतांना संशयित आरोपी विश्वास बाबर, यश बाबर, रोहित गायकवाड, निलेश सावंत, नरेश बाबर, अमित सावंत त्याठिकाणी आले व त्यांनी पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कुरापत काढून निलेश याच्या पोटावर, मानेवर तसेच पाठीवर काहीतरी धारदार शस्त्राने वार केले या घटनेत निलेश गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.


वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मयत निलेश याचा भाऊ रोहित श्रीपत उपाडे याने दिलेल्या तक्रारी वरून पंचवटी पोलिसात दंगल तसेच खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.