घातपाताचा पोलिसांना कॉल : यावलला पोलिसांनी मुखाग्नि देतानाच स्मशानभुमीतून मृतदेह घेतला ताब्यात !


Accidental call to the police : Yawal police seized the body from the cemetery while opening fire!
यावल :
शहरातील रेणुकादेवी मंदीर परिसरातील 45 वर्षीय दिव्यांग तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मयत तरुणावर नातलगांकडून दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असताना मयत तरुणाचा घातपात झाल्याची शक्यता वर्तावत निनावी फोन यावल पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी क्षणाचा ही विलंब न करता थेट स्मशानभुमीत अंतविधीसाठी नेलेला मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनाकरीता यावल रुग्णालयात आणला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

निनावी कॉलमुळे रोखले अंत्यसंस्कार
शहरातील रेणुकादेवी मंदिराजवळच्या परिसरात बाळू लक्ष्मण वाणी (45) हा दिव्यांग तरुण वास्तव्याला होता. या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. मयत तरुणाच्या पश्चात 85 वर्षीय वृध्द आई आहे. वृध्द आईने मुलाच्या मृत्यूची माहिती नातलगांना दिली. नातलगांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता मृतदेहाचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला व मृतदेेह थेट स्मशानभुमीत नेला. याबाबत यावल पोलिसांनी निनावी फोन करण्यात आला व या तरुणाच्या मृत्यू बाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी क्षणाचा ही विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, सहायक फौजदार विजय पाचपोळसह पथकास स्मशानभूमीत पाठवले व तेथून मृतदेह ताब्यात घेत यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. याबाबत निलेश नारायण वाणी यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.



शवविच्छेदनानंतर अनेक बाबींचा उलगडा
मयत तरुणाला मुखाग्नी देण्याची तयारी पूर्ण झाली व त्याच क्षणी पोलिसांनी स्मशानभुमी गाठली व अंत्यविधी थांबवला. मयत तरुणाचे प्रेत यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉ.प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले आहे. मयत बाळू वाणी या तरुणाला गेल्या काही दिवसांपासून त्या भागातील काही जण त्रास देत होते व त्यांच्या जाचाला तो कंटाळला होता. त्याने आत्महत्या केली का काही घातपात झाला या बाबत शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. काही जणांवर पोलिसांना संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !