म्हसावदच्या बेरोजगाराला ऑनलाईन गंडा : दिल्लीतील वकील जाळ्यात


जळगाव : एचडीएफसी बँकेत नोकरी लागल्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्राद्वारे म्हसावदच्या तरुणाची 93 हजारात फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीतील राहुल मदनलाल चौरसिया उर्फ अनिल सिंग (वय 24, मूळ रा. आझादनगर चंदौली, उत्तर प्रदेश, हल्ली मु. नवादा, उत्तमनगर, दिल्ली) या वकीलाला जळगाव सायबर क्राईमच्या पथकाने अटक केली आहे.

ऑनलाईन बेरोजगारांना गंडा
म्हसावदच्या सचिन मराठे उच्चशिक्षित बेरोजगाराने ‘नोकरी डॉट कॉम’ या वेबसाइटवर स्वत:चा बायोडाटा अपलोड केल्यानंतर आरोपी राहुल व त्याच्या साथीदारांनी याच वेबसाइटवरून सचिनची संपूर्ण माहिती घेतली. आरोपींनी 22 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2018 या दोन महिन्यांमध्ये राहुलसह त्याचे साथीदार रवीसिंग, करण भातपूर, करण लुथरा, श्रेया (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांनी सचिनला मोबाईलवरून संपर्क साधत नोकरीच्या आमिषाने तब्बल 93 हजार रुपये ऑनलाईन उकळले. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे, वसंत बेलदार, दिलीप चिंचोले व गौरव पाटील यांच्या पथकाने रविवारी आरोपी राहुलला दिल्लीतून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 27 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !