भरधाव डंपरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू


मुंबई : भरधाव डंपरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11.20 वाजताच्या सुमारास लोअर परेल परीसरातील डिलाईल रोड येथे ही घटन घडली. डंपर (एम.एच.43, बी.पी.6001) ने तिघांना चिरडल्यनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी डंबर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालकाला अटक केली आहे.  आरोपी डंपर चालकाने रस्त्याने पायी चालत जाणार्‍या संजय सखाराम पवार (59) आणि अज्ञात इसमाला चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. अनोळखीची अद्याप ओळख पटली नसून अपघातातील तिसर्‍या जखमीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !