यावल बाजार समिती सभापतीपदी तुषार पाटील बिनविरोध


यावल : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजप व काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे जळगाव जिल्हा उपप्रमुख तुषार सांडुसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक के.पी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सेनेचे सभापती भानुदास चोपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रीक्त झालेल्या सभापतीपदावर तुषार पाटील यांची बिनविरोध करण्यात आली. या बैठकीला माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी, माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी, माजी सभापती पांडुरंग दगडू सराफ, विद्यमान उपसभापती योगराज डिगंबर बर्‍हाटे, संचालिका अरुणा रामदास पाटील, कांचन ताराचंद फालक, संचालक उमेश प्रभाकर पाटील, डॉ.नरेंद्र वामन कोल्हे, सत्तार सुभान तडवी, अशोक त्र्यंबक चौधरी, सुनील वासुदेव बारी, पुंजो डिगंबर पाटील, विनोद पाटील, उमेश सतीश बेंडाळे हे संचालक उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तुषार पाटील यांची बिनविरोध होताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तुषार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटी , माजी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे विशेष आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !