एस.टी.चालकास चाकूच्या धाक दाखवत मारहाण


शेलवड फाट्याजवळील घटना : अनोळखीविरुद्ध गुन्हा

बोदवड : बस चालकाला चाकूचा धाक दाखवून एकाने मारहाण केल्याची घटना शेलवड फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी 5.50 वाजेच्या सुमारास घडली. जामनेर आगाराचे बस चालक संजय भागवत टोंगळे (40, कुर्‍हेपानाचे) हे मंगळवारी सायंकाळी जामनेर-बोदवड बस (एम.एच.20 डी.8914) ही शेलवड मार्गाने नेत असताना शेलवड-पळासखेड फाट्याजवळ अज्ञात आरोपीने दारूच्या नशेत बस अडवून बस चालक संजय भागवत टोंगळे यांना शिविगाळ करीत सरकारी गणवेशाच्या शर्टाचे बटन तोडुन वीट मारली तसेच चाकू काढून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला असून तपास पोलिस नाईक उद्दल चौहान करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !