भुसावळ व्यापारी मित्र मंडळातर्फे बस स्थानकावर मोफत जलसेवा
Free Water Service at Bus Station by Bhusawal Traders Friends Board भुसावळ : भुसावळ तापमानाच्या बाबतीत उच्चांक गाठत असताना पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक व्यवस्था बसस्थानक परिसरात नसल्याने येथील व्यापारी मित्र मंडळातर्फे जलसेवा उपलब्ध करून देण्यात आली. जलसेवेचे उद्घाटन भुसावळ व्यापारी मित्र मंडळाचे प्रमुख राधेश्यामजी लाहोटी, भुसावळ आगार प्रमुख राकेश शिवदे यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रथम आगार प्रमुख राकेश शिवदे व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील यांच्या हस्ते व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्यामजी लाहोटी व मित्रमंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोफत जल सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन राधेश्यामची लाहोटी यांनी केले. व्यापारी मित्र मंडळातर्फे दरवर्षी बस स्थानकावर पाणपोईची व्यवस्था करण्यात येते. कायमस्वरूपी रीतसर जागा उपलब्ध करून दिली तर नेहमीसाठी जलसेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे राधेश्यामजी लाहोटी यांनी सांगितले. यावेळी मोफत जलसेवेची देखरेख करणारे साहेबराव कोळी यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी मित्र मंडळाचे नरेंद्र लढ्ढा, प्रवीण भराडिया, राजूभाई पारीख, गिरीश मंत्री, राजेश लढा, संजय चांडक, चंद्रकांत मंत्री, संजय लाहोटी, अशोक काबरा, दिलीप टाक, रोहित लाहोटी, कमलेश झंवर, एस.टी.महामंडळाचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक नाना पाटील तर आभार आगारप्रमुख राकेश शिवदे यांनी मानले .





