चिनावमधील दगडफेक प्रकरणी 13 आरोपींना अटक

दगडफेकीत चौघे जखमी : पोलिसालाही धक्काबुक्की


13 accused arrested in case of stone pelting in Chinawal सावदा : जवळच असलेल्या चिनावल येथे दोन गटांमध्ये बॅनर व झेंडे लावण्यावरून जोरदार वाद झाला. वादानंतर जोरदार दगडफेकही करण्यात आल्याने या घटनेत तीन ते चार जण जखमी झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी एकूण 13 आरोपींविरोधात व 10 ते 12 अनोळखींविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 आरोपींना अटक करण्यात आली.

पोलीस कर्मचार्‍यालाही धक्काबुक्की
सोमवार, 8 रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चिनावल बससस्थानक परिसरात पोलीस चौकीसमोर दोन गटांमध्ये झेंडे व बॅनर लावण्यावरून वाद झाला. सावदा पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी धाव घेत वाद मिटवण्यास सुरूवात केल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल मुकदर इब्राहीम तडवी यांच्यावर दगडफेक करण्यात आली तसेच त्यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला व जमावबंदी आदेशाचे उल्लंघण करण्यात आले.



या संशयितांविरोधात गुन्हा
पोलीस कॉन्स्टेबल मुकदर इब्राहीम तडवी यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत मयूर उर्फ मंगेश विलास महाजन (25), संकेत संजय महाजन, (24), निर्मल युवराज महाजन (22), डिगेश्वर उर्फ अविनाश सुधीर लोखंडे (20), जयेश सतीश इंगळे (29), चेतन रामकृष्ण नारखेडे (28), नितीन संतोष भालेराव (28), सिद्धार्थ बळीराम भालेराव (37), हिरालाल गौतम भालेराव (30), दशरथ पितांबर वानखेडे (23), अमोल अशोक संन्यास (28), दीपक मधूकर झाल्टे (23), तेजस संतोष तायडे (23) व यांच्यासह 10 ते 12 अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दगडफेकीत मयूर महाजन, संकेत महाजन, निर्मल महाजन, दिगंबर लोखंडे, जयेश इंगळे, चेतन नारखेडे, तेजस तायडे यांना मार लागला आहे. दरम्यान चिनावल गावात त्यांना तणावपूर्ण शांतता असून जनजीवन सुरळीत आहे. वरील 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव
मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, अमोल गर्जे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील, संजय चौधरी, यशवंत टहाकडे, मेहरबान तडवी, विनोद तडवी, बबन तडवी, जळगाव येथील दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. आगामी सण-उत्सवात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !