रावेरात रविवारी ट्वेंटी-20 क्रिकेट निवड चाचणी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य ट्वेंटी-20 क्रिकेट संघटनेची नववी 15 वर्षाच्या आतील मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नंदुरबार येथे 7 ते 9 मार्च 2020 दरम्यान होत असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड रविवार, 1 मार्च रोजी दुपारी 12 वाजता व्ही.एस.नाईक महाविद्यालयच्या मैदानावर बर्हाणपूर रोड, रावेर येथे होत आहे. 1 ऑक्टोबर 2005 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटनेचे अध्यक्ष प्रा.आ.चंद्रकांत सोनवणे, डॉ.प्रदीप तळवलकर, टी.बी.महाजन, श्रीकांत महाजन, जयेश बीडपन, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, तारीख अहमद यांनी केले आहे.
