मुंबई पोलिस आयुक्तपदी परम बीर सिंह


मुंबई : मुंबई पोलिस आयुक्तपदी परम बीर सिंह यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. परमबीर सिंह हे 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून सध्या त्यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपदाची जबाबदारी होती. विद्यमान मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे हे शनिवार, 29 रोजीे सेवानिवृत्त झाल्याने रीक्त जागेवर परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे रीक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी बिपीन के. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !