मोठा वाघोदा गावात गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण
डॉक्टर व अधिकारी व आमदारांचा ताफा वाघोद्यात दाखल
An outbreak of gastro-like illness in village Big Waghoda मोठे वाघोदा : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावातील 20 ते 22 रुग्णांवर सावदा येथील वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. निंभोरा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.चंदन पाटील, वैद्यकीय सीएचओ आरोग्य सहाय्यक यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले तर काहींवर उपचार सुरू आहेत.
दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण
वाघोदा गावातील गणेश नगर, आंबेडकर नगर, मोठा वाडा, बेघर वस्ती रमाई नगर या भागातील या रुग्णांना उलट्या मळमळ व अतिसाराची लक्षणे दिसल्याने व रुग्ण वाढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या घटनेनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी खळबडून जागे झाले. दुपारी तीन वाजता प्राथमिक आरोग्याधिकारी व अधिकारी यांचा ताफा हजर झाला व त्यांनी सर्व आरोग्य सेवक व ग्रामपंचायतकडून संपूर्ण माहिती घेतली व गावात पाणी तपासणीच्या सुचना दिल्या. काही रुग्णांना निंभोरा रुग्णालयात पाठवण्यात आले.


अधिकारी वाघोद्यात तळ ठोकून
वाघोदा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.धापटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.बाळासाहेब वाभळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजय रिंढे, डॉ.सचिन ठाकूर, लोहारा, डॉ.निरज पाटील (चिनावल), आरोग्य विस्तार अधिकारी अब्दुल दस्तगीर, तालुका आरोग्य सहाय्यक राजेश खैरनार यांनी भेट दिल्या. सर्व माहिती घेऊन सूचना देण्यात आल्या
रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर
शेजारच्या प्रा.आ.केंद्र ऐनपूर येथील कर्मचारी आरोग्य सहाय्यक एम.ए.पवार, आरोग्य निरीक्षक सी.व्ही.पाटील, आरोग्य सेवक चंद्रकांत चौधरी, कैलास महाजन, डी.के.नमायते, खुशाल सुरजागडे, कैलास सरोदे, सुभाष ठाकुर, जीवन सोनवणे, शुभम महाजन, तुषार महाजन, प्रशांत नरवाडे आदींनी उपचाराकामी सहकार्य केले. मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील, रावेर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायकळ यांच्यासह निंभोरा, चिनावल, ऐनपूरसह तालुक्यातील पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारीसह कर्मचारी , सरपंच अलकाबाई महाजन यांनी पाहणी केली.