बुध्दपौर्णिमेला प्राणी गणनेत सातपुड्यात वन्यप्रेमींना वाघाचे दर्शन

प्राणी गणनेत 301 प्राण्यांची नोंद : जिल्हाधिकारी प्रसाद, रेल्वे डीआरएम ईती पांडे यांची उपस्थिती


Tiger sighting for wildlife lovers in Satpurdi during animal counting on Buddha Purnima रावेर :  यावल वन विभागातील सात वनपरिक्षेत्रात बुध्द पौर्णिमेला 23 मे रोजी ‘निसर्गानुभव’ आयोजित करण्यात आला. यावल वन विभागच्या इतिहासात प्रथमच निसर्ग अनुभव अंतर्गत 43 मचाणींसाठी ऑनलाईन बुकिंग ठेवण्यात आली व शंभर टक्के वन्यप्रेमींचा प्रतिसाद मिळाला. या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली. यात पर्यटकांना वाघ आणि बिबट्यांसह, अस्वल, कोल्हा, तरस, निलगाय, चिंकारा, चितळ, भेकर, सायाळ, रानडुक्कर, माकळ, मोर, घुबळ, सर्पगरुड, रातवा, कापशी घार, धामणसाप, घोणस, मन्यार इत्यादी वन्यप्राणी पहायला मिळाले.

वाघाचे घडले दर्शन
यावल वन विभागाच्या इतिहासात प्रथमच सातपुडा सफारी मार्गातील चिंचाटी धरणावरील अंजन मचानीवर असलेले वन्यजीप्रेमी अर्जुन ठाकुर, वनरक्षक राजु बोंडल यांना वाघाचे दर्शन झाले. रावेर वनक्षेत्रातील गारबर्डी, लोहारा, कुसुंबा या सफारी क्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. सातपुड्यातील जंगल निसर्गातील विविधतेने नटलेले आहे. मेळघाट, आंबाबरवा, डोलारखेडा व यावल अभियारण्य हा वाघांचा भ्रमणतीमार्ग असून त्यामुळे यावल वनविभागात रावेर वनक्षेत्रात वेळोवेळी वाघाचे दर्शन होत आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेपर्यंत ही गणना सुरू असतांना यावल वन विभागाचे 120 क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी प्राण्यांचे निरीक्षण नोंदवले.



रावेर वनक्षेत्रात 12 मचाणीवर झाले 301 प्राण्यांचे दर्शन
या प्राणी गणनेत एक वाघ, बिबट 4, अस्वल एक, वानर 95, लांडगा 12, चिंकारा 37, ससा 27, मोर 34, रानमांजर 7, कोल्हा 9, तरस 2, रानडुक्कर 47, काळवीट 22, चौशीगा 18, भेकर 24, निलगाय 12, घुबड 19 असे एकूण 301 प्राणी आढळले.

जिल्हाधिकारी यांनी मचाणावर बसून केली प्राणी गणना
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेच्या डीआरएम इती पांडे, उपवनसंरक्षक जमीर शेख, फैजूपर प्रांताधिकारी देवयानी यादव यांनी मचाणावर बसून प्राणी गणना केली. यावल वनविभागचे उपवनसंरक्षक याचे प्रभावी सरंक्षण व जंगलात केलेली पाण्याची व्यवस्थामुळे गत वर्षापेक्षा या वर्षी प्राणी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

म्हणूनच बुध्दपौर्णिमेला प्राणिगणना
उन्हाळ्यात जंगल भागात नदी, नाले कोरडे झालेले असतात. मोजक्या ठिकाणी नैसर्गिक पाण्वठे असतात. त्याचप्रमाणे वनविभागामार्फत ठिक-ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केली जातात व याठिकाणी जंगल भागातील वन्यप्राणी आपली तहाण भागविण्यासाठी रात्रीतून एकदातरी या पाणवठयांवर येतात. बुध्दपौर्णिमेच्या दिवशी पूर्णचंद्र असल्याने त्याच्या लख्ख प्रकाशात दरवर्षी महाराष्ट्रात प्राणी गणना केली जाते, असे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.

विविध प्रजातीचे वन्यजीवांचे दर्शन
यावल वन विभागात गेल्या दोन वर्षापासून सातपुडा परिसरात वन्यप्राण्यांकरीता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कामे करण्यात आली आहेत त्यामुळे सातपुडा परिसरात जैविक विविधता निर्माण झालेली आहे. वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होण्याकामी पोषक वातावरण तयार झाले आहे. यावल वन विभागात बुध्दपौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणनेकामी 43 मचाण तयार करण्यात आले. परिसरातील निसर्गप्रेमी नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला. प्राणी गणना यशस्वीरित्या लोकसहभागतून करण्यात आली. निसर्गप्रेमींना प्राणी प्रगणनेदरम्यान विविध प्रजातीचे वन्यजीवांचे दर्शन झाले. रावेर वनक्षेत्रात सातपुडा सफारी परिसरातील मचाणावरुन वाघाचे दर्शन झाले असल्याचे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम.शेख म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !