वढोदा परिक्षेत्रातील आठ मचाणीवरून झाली प्राणी गणना


मुक्ताईनगर : मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र अंतर्गत वढोदा वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात आली. डोलारखेडा, वढोदा, चारठाणा अश्या विविध ठिकाणी पाणवठे व आठ मचानी तयार करण्यात आल्या. गुरुवार, 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री विविध संस्थेच्या व वन्यजीव प्रेमींकडून प्राणी गणना करण्यात आली.

असे आढळले प्राणी
डोलारखेडा वणहद्दीत चितळ 28, माकड 8, मोर 2, लांडगा 4, ससा 1,टिटवी 3, भेकर 1, नीलगाय 24 सायळ 1 तर चारठाणा हद्दीत चितळ 23, माकड 5, मोर 3, लांडगा 9, ससा 1, टिटवी 4, भेकर 1, रानमांजर 3, नीलगाय 10,
कुर्‍हा हद्दीत चितळ 19, माकड 4, मोर 1, लांडगा 1, टिटवी 2, अस्वल 1, नीलगाय 7 अश्या विविध प्राण्यांची गणना करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !