भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बेपत्ता मुलीचा दोन तासात लावला शोध
भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात बाजारासाठी आलेल्या बारेला परीवारातील एक लहान मुलगी आपल्या आई-वडीलांसह आल्यानंतर गर्दीत हरवली होती मात्र बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या दोन तासात या बालिकेचा शोध घेत तिला पालकांच्या ताब्यात दिले. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान भुसावळात आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी तारसिंग बारेला पत्नी व मुलांसोबत आल्यानंतर त्यांची चारर वर्षाची मुलगी आई-वडिलांची नजर चकवून रजा टॉवर भागात फिरत-फिरत निघून गेली. ती फिरत असतांना सुमनबाई भगवान इंगळे (अकलुद) यांना दिसल्यानंतर त्यांनी त्या मुलीला बाजारपेठ पोलिस स्टेशनला आणले व पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी भेट घेवून हरविलेल्या मुलीची माहिती दिली. बाजारपेठ निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकातील पोलिसांना मुलींच्या आई-वडिलांच्या शोधासाठी पाठवल्यानंतर दोन तासानंतर डिस्को टॉवर भागाकडे मुलीचे आई-वडील चिंताग्रत अवस्थेत दिसल्यानंतर त्यांना हरवलेल्या मुलीला दाखवल्यानंतर त्यांनी ती आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. यावेळी बालिकेला पालकांच्या ताब्यता देण्यात आले. अवघ्या दोन तासात नाईक अनिल पाटील, राहुल चौधरी, ईश्वर भालेराव, वैशाली सोनवणे, पोलीस मित्र जेरी फॅन्सीस दिसुजा यांची भूमिका मोलाची ठरली.
